लालचुटुक स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Monika Lonkar –Kumbhar

स्ट्रॉबेरी

आईसक्रीम, केक, मिल्कशेक आणि मॉकटेल इत्यादी अनेक खाद्यपदार्थांमध्ये स्ट्रॉबेरीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

चवीला आंबट-गोड लागणारी स्ट्रॉबेरी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. या व्हिटॅमिन सी मुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

हृदयासाठी लाभदायी

स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. शिवाय, हृदयरोगांपासून ही बचाव होतो.

निरोगी आतडी

स्ट्रॉबेरी आपल्या आतड्यांमध्ये आढळणाऱ्या प्रोबायोटिक सूक्ष्मजंतूंसाठी फायदेशीर आहे, जे पचनास मदत करतात.

कॅन्सरपासून बचाव

स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे ऑक्सिडेशन आणि जळजळ होण्यास प्रतिबंध होतो. शिवाय, यामध्ये एल्जिक ॲसिड आढळते, जे कोलोरेक्टल कॅन्सर रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकते.

मेंदूसाठी फायदेशीर

स्ट्रॉबेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे मेंदूच्या पेशींसाठी फायदेशीर असतात.

स्ट्रेचिंगसाठी आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे धनुरासन