रोहित कणसे
अनेकांना सकाळची सुरुवात दुध घातलेल्या चहाने करायला आवडते. पण जास्त प्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितेले जाते.
त्यामुळे काही लोक साखर नसलेला चहाही पितात, यादरम्यान आपण जर एक महिन्यापर्यंत साखरेशिवाय चहा प्यायल्यास काय होईल याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
एक महिना साखरेशिवाय चहा घेतल्यास शरीराशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात, तसेच यामुळे तुमच्या आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात.
साखरेशिवाय केलेला चहा पिणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. साखर घातलेल्या चहामुळे मधुमेह टाइप-2 होण्याचा धोका असतो.
एक महिना साखरेशिवाय चहा प्यायल्यास वजन वाढत नाही. असे केल्याने तुम्ही भरपूर कॅलरीज वाचवू शकता.
आपल्या पोटातील मायक्रोबायोमची पीएच पातळी संतुलित नसल्यास शरीराशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे साखर न घतलेला चहा प्यायल्याने पीएच पातळी योग्य राहण्यास मदत होते.
जर तुम्हाला खूप दिवसांपासून गॅसचा त्रास होत असेल तर आजपासूनच साखर घातलेला चहा पिणे बंद करा. असे केल्याने अन्न सहज पचते आणि पोटात गॅस होत नाही.
जर तुम्ही एक महिन्यापर्यंत दररोज साखर न घातलेला चहा प्यायला तर शरीरावर येणारी सूज कमी होण्यास मदत होते.
रोज साखरेचा चहा प्यायल्याने अॅसिडीटी, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या होऊ शकतात. याशिवाय लठ्ठपणा देखील वाढू शकतो.
अंकिता वालावलकरचे चाहते झाले नाराज