Monika Lonkar –Kumbhar
नियमितपणे योगा केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
नियमित योगासोबतच संतुलित आहार घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
योगासनांपैकीच एक असलेले उत्तानासन हे आसन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे संपूर्ण शरीराला चांगला ताण मिळतो.
नियमितपणे या उत्तानासनाचा सराव केल्याने पाठीचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते आणि पाठदुखीपासून आराम मिळू शकतो.
ताण-तणावापासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे. फक्त याचा न चुकता सराव करणे गरजेचे आहे.
उत्तानासनाचा नियमितपणे सराव केल्याने डोकेदुखी आणि निद्रानाशची समस्या दूर होण्यास मदत होते.
दररोज हे योगासन केल्याने मेंदू मजबूत होतो आणि मन शांत राहते.