मायक्रोवेव्हमध्ये चुकूनही करू नका 'हे' पदार्थ गरम..

Aishwarya Musale

एखादा खाद्यपदार्थ पटकन गरम करण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर केला जातो.

मायक्रोवेव्हमुळे लोकांचं काम सुलभ, सोपं झालयं यात काहीच शंका नाही. पण काही लोक उठसूठ कोणतेही पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम करतात, जे धोक्याचे ठरू शकते.

काही पदार्थ असे आहेत की ते मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नयेत.

तांदूळ

काहीजण भात खाण्यापूर्वी तो मायक्रोवेव्हमध्ये गरम करतात. पण यामुळे त्यातील बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मायक्रोवेव्हमध्ये भात गरम करणे टाळावे

अंड्याचे पदार्थ

अंड्याचे पदार्थ कधीच मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नयेत. अंड्याची एखादी डिश बनवली तर ती लगेचच खावी किंवा परत गरम केली तर थोडं गार करून खावी.

मासे

बहुतेक लोकांना मांस गरम असताना खायला आवडतं, जरी ते शिळे झाले असले तरीही बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये ते गरम करून खाण्याची चूक करतात. पण असे करू नये. कारण ओव्हनमध्ये मांस गरम केल्याने त्याची चव खराब होऊ शकते.

तळलेले पदार्थ किंवा फ्रेंच फ्राईज मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याची चूक करत असाल तर आजपासून असे करू नका.

तळलेले पदार्थ

कारण फ्रेंच फ्राईज मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास त्यांचा कुरकुरीतपणा कमी होऊ शकतो आणि त्यांची चव देखील बदलू शकते.

हात-पाय टॅन झालेत? मग करा हे घरगुती उपाय..