मुलांच्या आहारात 'या' 4 गोष्टींचा करा समावेश...

Aishwarya Musale

व्हिटॅमिन डी

आपल्या सर्वांना माहित आहे की व्हिटॅमिन डी आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि या जीवनसत्वाचा सर्वोत्तम स्त्रोत सूर्यप्रकाश आहे. हिवाळ्यात मुलं कमी घराबाहेर पडतात. त्यामुळे त्यांच्या हाडांना खूप नुकसान होऊ शकते.

health | sakal

आहार

अशा परिस्थितीत, मुलांची व्हिटॅमिन डीची गरज पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे ज्यामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर आहे. मुलांच्या चांगल्या विकासासाठी त्यांच्या आहारात कोणते पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत ते जाणून घेऊया.

health | sakal

अंडी

किड्स हेल्थच्या अहवालानुसार, जर तुमच्या मुलाला दूध आवडत नसेल आणि त्याला अंडी आवडत असतील, तर त्याला अंडी खायला द्या. होय, दुधाप्रमाणेच अंड्यामध्येही व्हिटॅमिन डी भरपूर असते.

health | sakal

अंड्याचा पांढरा भाग, ज्याला एग व्हाईट देखील म्हणतात, त्यात पुरेसे प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. अशा परिस्थितीत त्यांना दररोज एक अंडे खायला द्यावे.

health | sakal

दुग्धजन्य पदार्थ

हाडे मजबूत करण्यासाठी दररोज एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन डीचे चांगले प्रमाण असलेले दुसरे दुग्धजन्य पदार्थ म्हणजे 'पनीर'. तुम्ही मुलांना स्नॅक्स म्हणून देऊ शकता. बऱ्याच मुलांना पनीर खूप आवडतं.

health | sakal

संत्र्याचा रस

खूप कमी लोकांना माहित आहे की संत्र्यामध्ये व्हिटॅमिन डी देखील मुबलक प्रमाणात आढळते. मुलांनी रोज एक संत्री खाल्ल्यास किंवा एक ग्लास संत्र्याचा रस प्यायल्यास त्यांच्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळतो.

health | sakal

मशरूम

तुम्ही तुमच्या मुलाच्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात मशरूमचा समावेश केला पाहिजे. यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते.

health | sakal

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी केवळ लहान मुलेच नाही तर प्रौढ देखील त्यांच्या आहारात मशरूमचा समावेश करू शकतात. यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतील.

health | sakal

'हे' पदार्थ वाढवतील शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण..