Saisimran Ghashi
थंडीचे दिवस सुरू झाले की अनेक लोक ब्लँकेटमध्ये डोकं लपवून, पूर्ण अंगभर ओढून झोपतात.
परंतु, तुम्हाला माहिती आहे का हे काही प्रमाणात नुकसानकारक ठरू शकते.
ब्लँकेटमध्ये डोकं लपवण्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते, कारण चादरमध्ये हवा बंद होते. यामुळे श्वासोच्छ्वासाची समस्या निर्माण होऊ शकते.
तोंडावर ब्लँकेट घेतल्याने घाम येणे सुरु होऊ शकते. घामामुळे शरीर थोड्याच वेळात थंड होऊ शकते आणि आपल्याला आरामदायक झोप मिळवणे कठीण होऊ शकते.
उष्णतेमुळे त्वचा जास्त कोरडी होऊ शकते आणि डोळ्यांत सूज किंवा खाज सुटू शकते.
सतत ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपल्याने पिंपल्स आणि acne येऊ शकतात.
ब्लँकेट चेहऱ्यावर घेऊन झोपल्याने रक्ताभिसरण योग्यरित्या होत नाही.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.