Monika Shinde
अनेक लोक झोपताना संगीत ऐकण्यासाठी इअरबड्स वापरतात. पण तुम्हाला माहिती आहे का? यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊया याचे धोके
इअरबड्स लावून झोपल्यामुळे कानात घाम, धूळ किंवा बॅक्टेरिया जमा होऊ शकतो. यामुळे कानाला इन्फेक्शन होऊ शकते. काही वेळा इअरबड्स कानात दाब देतात, त्यामुळे कान दुखायला लागतो.
इअरबड्समधून जोरात आवाज ऐकला, तर हळूहळू ऐकायची ताकद कमी होते. झोपेत आवाज कधी कधी आपोआप वाढतो, याचा कानांवर वाईट परिणाम होतो.
इअरबड्स सतत वापरल्यामुळे कानात मळ साचतो. त्यामुळे कान बंद होतात आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो.
झोपताना इअरबड्स वापरल्यामुळे मेंदू पूर्णपणे विश्रांती घेत नाही. काही वेळा वायरलेस इअरबड्समधून येणारे रेडिएशन मेंदूवर वाईट परिणाम करू शकते.
इअरबड्स लांब वेळ कानात राहिल्यामुळे त्वचेवर जळजळ, सूज किंवा लालसरपणा येऊ शकतो.
रात्री झोपताना इअरबड्सचा वापर करू नये. आणि दिवसभरात एकावेळी १ तासापेक्षा जास्त इअरबड्स वापरू नका.तसेच सतत वापरात असला तर नियमित इअरबड्स स्वच्छ ठेवा.