सकाळ डिजिटल टीम
टोमॅटोमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. परंतु, काही विशिष्ट आरोग्यस्थितीत ते त्रासदायक ठरू शकतात.
Tomato Side Effects
esakal
त्यातील आम्लता, बिया आणि काही संयुगे काही लोकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या लोकांनी टोमॅटो टाळावे.
Tomato Side Effects
esakal
टोमॅटोच्या बियांमध्ये ऑक्सलेट भरपूर प्रमाणात असते. हे ऑक्सलेट किडनी स्टोन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. ज्यांना आधीपासूनच किडनी स्टोनची समस्या आहे, त्यांनी टोमॅटो विशेषतः त्याच्या बिया टाळाव्यात.
Tomato Side Effects
टोमॅटो नैसर्गिकरित्या आम्लयुक्त असतात. त्यामुळे पोटातील आम्लता वाढते आणि गॅस, छातीत जळजळ, अपचन यांसारख्या समस्या वाढू शकतात. अशा लोकांनी टोमॅटोचे सेवन कमी करणे योग्य.
Tomato Side Effects
टोमॅटोमध्ये सोलानाइन नावाचे संयुग असते, जे काही व्यक्तींमध्ये जळजळ वाढवू शकते. संधिवात किंवा सांधेदुखी असलेल्या लोकांनी टोमॅटो मर्यादित प्रमाणात खावेत.
Tomato Side Effects
esakal
काही लोकांना टोमॅटो खाल्ल्यानंतर पुरळ, खाज, लालसरपणा किंवा सूज येऊ शकते. अशा व्यक्तींनी टोमॅटो खाण्यापूर्वी त्वचारोग तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
Tomato Side Effects
टोमॅटोचे आंबटपण व बिया पचण्यास जड जातात. त्यामुळे फुगणे, जडपणा किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते. पचनक्रिया कमजोर असलेल्या लोकांनी त्यांचे सेवन नियंत्रित ठेवावे.
Tomato Side Effects
टोमॅटोमध्ये आढळणारी काही संयुगे काही व्यक्तींमध्ये मायग्रेनचा झटका ट्रिगर करू शकतात. टोमॅटो खाल्ल्यानंतर डोकेदुखी वाढत असल्यास ते टाळणे चांगले.
Tomato Side Effects
प्रिय वाचकांनो, ही माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. हा लेख उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आला आहे. कोणत्याही आरोग्यसंबंधी उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Tomato Side Effects
esakal
kidney damaging morning habits
esakal