छातीत जळजळ झाली की काय करावे? 'हे' सोपे उपाय देतील झटपट दिलासा!

सकाळ डिजिटल टीम

छातीत जळजळ का होते?

छातीत जळजळ ही एक सामान्य, पण त्रासदायक समस्या आहे. पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर येऊ लागल्यास जळजळ निर्माण होते. याला आम्लपित्त किंवा अॅसिडिटी असेही म्हणतात. छातीत जळजळ होत असल्यास खालील उपाय उपयोगी ठरू शकतात.

What Causes Chest Burning and Heartburn?

|

esakal

१. थंड दूध प्या

छातीत जळजळ जाणवताच एक ग्लास थंड दूध प्या. दूध पोटातील आम्ल निष्क्रिय करते, पोटाला थंडावा देते आणि त्वरित आराम मिळतो.

What Causes Chest Burning and Heartburn?

|

esakal

२. नारळ पाणी प्या

नारळ पाणी शरीराची PH पातळी संतुलित ठेवते. यामुळे पोटातील जळजळ कमी होते आणि अन्ननलिकेतील त्रासही कमी होतो.

What Causes Chest Burning and Heartburn?

| esakal

३. केळी खा

केळीमध्ये नैसर्गिक Anti-acid गुणधर्म असतात, जे आम्लता कमी करण्यात मदत करतात. दिवसातून एक-दोन केळी खाल्ल्याने छातीत होणारी जळजळ आटोक्यात येते.

What Causes Chest Burning and Heartburn?

|

esakal

४. मसालेदार आणि जंक फूड टाळा

मिरची, मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ व जंक फूड आम्ल उत्पादन वाढवतात. त्यामुळे असे पदार्थ टाळा आणि हलके, घरचे, फायबरयुक्त अन्न सेवन करा.

What Causes Chest Burning and Heartburn?

|

esakal

5. खाल्ल्यावर लगेच झोपू नका

जेवणानंतर लगेच झोपल्यास किंवा वाकल्यास आम्ल वर येऊ शकते. त्यामुळे जेवणानंतर किमान ३०–४० मिनिटे सरळ बसा.

What Causes Chest Burning and Heartburn?

|

esakal

6. हलके चालत जा

जेवणानंतर 10–15 मिनिटे हलके चालल्याने पचन सुधारते आणि आम्लपित्त व गॅसची समस्या कमी होते.

What Causes Chest Burning and Heartburn?

|

esakal

7. आले व तुळशीचे सेवन करा

आले पचन सुधारते आणि आम्ल नियंत्रणात ठेवते. तुळशीची काही पाने चघळल्याने किंवा तुळशीचा काढा प्यायल्याने छातीत जळजळ कमी होते.

What Causes Chest Burning and Heartburn?

| esakal

Kidney Damage Foods : 'हे' खाल्लं तर किडनी लवकर होते खराब! आजच डाइटमधून काढून टाका

Kidney Damage Foods

|

esakal

येथे क्लिक करा...