IPLमध्ये 100 व्या सामन्यात सर्वात मोठी खेळी करणारे क्रिकेटपटू

प्रणाली कोद्रे

राजस्थान रॉयल्सचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 19 व्या सामन्यात 6 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला राजस्थान रॉयल्स संघाने 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.

Jos Buttler - Virat Kohli | Sakal

100 वा आयपीएल सामना

राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देण्यात जॉस बटलरने शतक करत मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे हा बटलरचा 100 वा आयपीएल सामना होता.

RR vs RCB | Sakal

बटलरची शतकी खेळी

या सामन्यात बटलरने 58 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 100 धावांची नाबाद खेळी केली.

Jos Buttler | Sakal

दुसराच खेळाडू

त्यामुळे बटलर 100 व्या आयपीएल सामन्यात शतक करणारा केएल राहुलनंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे.

Jos Buttler | Sakal

केएल राहुल

केएल राहुलने 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना 100 वा आयपीएल सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला होता, ज्यात त्याने नाबाद 103 धावांची खेळी केली होती.

KL Rahul | X/IPL

फाफ डू प्लेसिस

दरम्यान, 100 व्या आयपीएल सामन्यात सर्वोच्च खेळी करणाऱ्या फलंदाजांमध्ये केएल राहुल आणि बटलर यांच्यापाठोपाठ फाफ डू प्लेसिस आहे. त्याने 2021 आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 59 चेंडूत 86 धावांची खेळी केली होती.

Faf du Plessis | X/ChennaiIPL

डेव्हिड वॉर्नर

या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर असून त्याचा 2016 आयपीएलचा अंतिम सामना 100 वा सामना होता. या सामन्यात त्याने 38 चेंडूत 69 धावांची खेळी केली होती.

David Warner | X/IPL

मुरली विजय

पाचव्या क्रमांकावर मुरली विजय असून त्याने 2016 मध्ये पंजाब किंग्सकडून रायझिंग पुणे सुपर जायंट्सविरुद्ध 100वा आयपीएल सामना खेळला होता. या सामन्यात त्याने 41 चेंडूत 59 धावा केल्या होत्या.

Murali Vijay | X/IPL

IPL: रेकॉर्डब्रेक शतके! विराटचा विश्वविक्रम, तर बटलरची गेलशी बरोबरी

Jos Buttler - Virat Kohli | X/IPL