सकाळ डिजिटल टीम
हिमेश रेशमिया सध्या ‘बॅडएस रवी कुमार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि तो सोशल मीडियावर गाजत आहे.
ट्रेलरला तीन दिवसांत ६.२ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. ट्रेलर लोकप्रिय ठरत असताना, तो वादग्रस्त देखील ठरला आहे.
ट्रेलरमधील एक डायलॉग "कुंडलीत शनी, घीच्या सोबत हनी आणि रवी कुमारशी दुश्मनी सेहत के लिए हानिकारक है" प्रेक्षकांना खूप आवडला.
मात्र, भोजपुरी अभिनेता पवन सिंगच्या फॅन्सने आरोप केला की, पवनने हा डायलॉग आधीच वापरला होता.
पवन सिंगच्या चाहत्यांनी हिमेशवर डायलॉग चोरल्याचा आरोप केला आहे. यामुळे हिमेश आणि पवन सिंगच्या फॅन्समध्ये वाद निर्माण झाला आहे.
काहींना असे वाटते की, हिंदी चित्रपट भोजपुरी चित्रपटांचे डायलॉग्स कॉपी करत आहेत. तर काहींनी हा डायलॉग साम्य योगायोग मानला आहे.
या वादांमुळे हिमेशच्या चित्रपटाला आणखी प्रसिद्धी मिळत आहे. चित्रपटाने अक्षय कुमारच्या ‘स्कायफोर्स’ला मागे टाकले आहे.
‘स्कायफोर्स’च्या ट्रेलरला ३.२ कोटी व्ह्यूज मिळाले, जे हिमेशच्या ट्रेलरच्या तुलनेत निम्मे आहेत.
‘बॅडएस रवी कुमार’ हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.