सकाळ डिजिटल टीम
हिंदू धर्मात गाय ही अत्यंत पूजनीय मानली जाते. गायीची सेवा केल्याने केवळ धार्मिक पुण्य मिळतेच, पण आयुष्यात सकारात्मक बदल घडतात, असे मानले जाते. विशेषतः, गायीला विशिष्ट पिवळी वस्तू खाऊ घातल्याने आर्थिक समृद्धी प्राप्त होते, असा विश्वास आहे.
गायीला दररोज चारा देणे हे एक शुभ कार्य मानले जाते. मात्र, काही खास दिवशी गायीला पिवळ्या वस्तू, विशेषतः हळद खाऊ घालण्याचा धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अधिक लाभ होतो असे मानले जाते. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते.
हळद ही एक शुभ, पवित्र आणि औषधी गुणांनी युक्त अशी पिवळी वस्तू आहे. गायीला हळद खाऊ घालणे हे एक अत्यंत प्रभावी उपाय मानले जाते. यासाठी एक लहानसा पिठाचा गोळा बनवा, त्यात हळद मिसळा आणि हा गोळा गायीला श्रद्धेने खाऊ घाला.
हळद खाऊ घालण्याचा हा उपाय गुरुवारी करणे विशेष फलदायी मानले जाते. गुरुवार हा गुरु ग्रहाचा दिवस असून हा ग्रह संपत्ती, ज्ञान आणि सौभाग्याशी संबंधित आहे. त्यामुळे या दिवशी गायीला हळद मिसळलेला पिठाचा गोळा खाऊ घालल्यास आर्थिक स्थैर्य प्राप्त होते.
जर तुम्ही दर गुरुवारी श्रद्धेने हा उपाय केला, तर आयुष्यात कधीही पैशाची टंचाई भासणार नाही, असा समज आहे. यामुळे आर्थिक प्रगतीसह मानसिक समाधानही मिळते.
वरील लेखात दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि लोकमान्यतांवर आधारित आहे. यामध्ये कोणतीही वैज्ञानिक पुष्टी नाही. कृपया तुमच्या श्रद्धेनुसार निर्णय घ्यावा.