Chinmay Jagtap
संपूर्ण राज्यात क्वचितच एखादी व्यक्ती असेल ज्याला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काय आहे हे माहिती नसेल
मुंबईतील लालबाग परिसरातला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संपूर्ण राज्यात विख्यात आहे
लालबागचा राजा नवसाला पावतो असं म्हटलं जातं
मात्र लालबागचा राजाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?
1934 साली लालबागचा राजा मित्र मंडळाची स्थापना झाली
त्याकाळी कोळी समाजातील मच्छीमारांनी बाप्पाला नवस केला आणि बाप्पाने तो ऐकला यामुळेच या ठिकाणी बाप्पा विराजमान झाला असं म्हटलं जातं.
.
1932 साली लालबाग मधील पेरू चाळ बाजारपेठ बंद करण्यात आली. यामुळे तेथील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. यासाठी आम्हाला कायमस्वरूपी जागा मिळावी असे म्हणत मच्छीमारांनी बाप्पाला नवस केला. त्यानंतर तो पूर्ण झाला.
पुढेयाच कोळी बांधवांनी या ठिकाणी बाप्पाची मुर्ती बसवली. त्यानंतर लालबागचा राजा नवसाला पावतो असे म्हणले जाऊ लागले