सकाळ डिजिटल टीम
नाशिक शहराच्या नावाचा इतिहास काय आहे तुम्हाला माहीत आहे का?
नाशिक शहराला नाशिक हे नाव नेमके कसे पडले या मागचा इतिहास काय आहे जाणून घ्या.
नाशिक शहराला 'नाशिक' हे नाव 'रामायण' या महाकाव्यातील एका प्रसंगावरून पडले, असे मानले जाते.
रामायणात, भगवान राम १४ वर्षांच्या वनवासात असताना, शूर्पणखा नावाची राक्षसणी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करते.
प्रभु श्रीराम यांच्या रागामुळे लक्ष्मण शूर्पणखाचे नाक कापतो. या घटनेमुळे या ठिकाणाला 'नाशिक' हे नाव मिळाल्याचे मानले जाते
काही लोक 'नाशिक' हे नाव संस्कृतीतील 'नासिका' (नासिक) या शब्दावरून आले आहे असे ही मानतात.
नासिका म्हणजे नाक. यावरून नाशिकला 'नाशिक' असे नाव पडले,
नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो.
या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव 'नासिक' असे पडले. असे म्हंटले जाते.