सकाळ डिजिटल टीम
भारतात सर्वात प्रथम विमान कधी उडालं होतं तुंम्हाला माहित आहे का?
भारतात सर्वात प्रथम विमान कधी आणि कुठून उडालं होतं जाणून घ्या.
भारतामध्ये पहिले व्यावसायिक विमान उड्डाण १८ फेब्रुवारी १९११ रोजी झाले.
भारतामध्ये पहिले व्यावसायिक विमान उड्डाण हे जे हेन्री पेकेट यांनी अलाहाबाद ते नैनी येथे केले.
हे उड्डाण अलाहाबाद येथील औद्योगिक आणि कृषीविषयक प्रदर्शनातून यमुना नदीच्या पलीकडे नैनी येथे सुमारे १५ मिनिटांसाठी झाले, असे सांगितले जाते.
या उड्डाणाने भारतातील हवाई वाहतुकीला सुरुवात झाली, असे मानले जाते.
या उड्डाणाचे अंतर सुमारे ९.७ किलोमीटर (६ मैल) असल्याचे सांगीतले जाते.
या उड्डाणासाठी हंबर बायप्लेन या नावाटचे विमान वापरण्यात आले असल्याचे सांगण्यात येते.
भारतात पहिले विमान उड्डाण झाल्याचा असा इतिहास सांगण्यात येतो.