Horoscope 10 February 2026: 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मिथुन :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कर्क :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

सिंह :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कन्या :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ :

कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

वृश्‍चिक :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

धनु :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मकर :

प्रियजनांचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

कुंभ :

अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मीन :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.