Horoscope 11 March 2026: 'या' राशीच्या लोकांना मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

वृषभ :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.

मिथुन :

हितशत्रुंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क :

संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

सिंह :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या :

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

तुळ :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्य उत्तम राहील.

धनु :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

मकर :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कुंभ :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

मीन :

गुरुकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.