Horoscope 14 March 2025: 'या' राशीच्या लोकांचे मन आनंदी व आशावादी राहील

सकाळ वत्तसेवा

मेष :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृषभ :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्दीने कार्यरत रहाल.

मिथुन :

वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

कर्क :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

सिंह :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तुळ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

वृश्‍चिक :

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

धनु :

व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

मकर :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कुंभ :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

मीन :

प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.