Horoscope 17 February 2026: 'या' राशीच्या लोकांचा मनोबल कमी राहील

सकाळ वृत्तसेवा

मेष :

शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष सुयश लाभेल.

कर्क :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

सिंह :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

कन्या :

कोणालाही जामीन राहू नका. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

तुळ :

संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृश्‍चिक :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

धनु :

काही कामे धाडसाने पार पाडाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कुंभ :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

मीन :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.