Horoscope 2 February 2026: 'या' राशीच्या लोकांची नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील

सकाळ वृत्तसेवा

मेष :

नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृषभ :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. उत्साह व उमेद वाढेल.

मिथुन :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

सिंह :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

कन्या :

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तुळ :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आरोग्य उत्तम राहील.

धनु :

प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

मकर :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

कुंभ :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मीन :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.