Horoscope 2 March 2026: 'या' राशीच्या लोकांचे राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील

सकाळ वृत्तसेवा

मेष :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृषभ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मिथुन :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कर्क :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

सिंह :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

कन्या :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

वृश्‍चिक :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल.

धनु :

गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मकर :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कुंभ :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मीन :

हितशत्रुंवर मात कराल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.