Horoscope 20 February 2026: 'या' राशीच्या लोकांचे खर्चाचे प्रमाण वाढेल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

वृषभ :

अनेकांचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

मिथुन :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कर्क :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह :

वाहने जपून चालवावीत. मनोबल कमी राहील.

कन्या :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

तुळ :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृश्‍चिक :

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततिसौख्य लाभेल.

धनु :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

मकर :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. गुरूकृपा लाभेल.

कुंभ :

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. शासकीय कामे मार्गी लागतील.