Horoscope 22 February 2026: 'या' राशीच्या लोकांना अनेकांचे सहकार्य लाभेल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

वृषभ :

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कर्क :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

सिंह :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कन्या :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

तुळ :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

वृश्‍चिक :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनु :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

मकर :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

कुंभ :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मीन :

व्यवसायाची उलाढाल वाढेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.