Horoscope 22 November 2025: 'या' राशीच्या लोकांना हितशत्रुंचा त्रास संभवतो

पुजा बोनकिले

मेष :

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन :

हितशत्रुंचा त्रास संभवतो. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कर्क :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. शासकीय कामे मार्गी लागतील.

सिंह :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

कन्या :

काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरूकृपा लाभेल.

तुळ :

कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

वृश्‍चिक :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनु :

कोणालाही जामीन राहू नका. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

मकर :

अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.

कुंभ :

आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मीन :

जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.