Horoscope Prediction 24 November 2025: आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' राशीच्या लोकांना नवी दिशा अन् मार्ग सापडेल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

मिथुन :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

कर्क :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

सिंह :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कन्या :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

तुळ :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृश्‍चिक :

जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

धनु :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मकर :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ :

नवीन स्नेहसंबंध जुळतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

मीन :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.