Horoscope 27 February 2026: 'या' राशीचे लोक आपल्या मतांविषयी आग्रही राहतील

सकाळ वृत्तसेवा

मेष :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

वृषभ :

जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन :

मन आनंदी व आशावादी राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

कर्क :

खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.

सिंह :

अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

कन्या :

नवीन परिचय होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

तुळ :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक :

मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

धनु :

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

कुंभ :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मीन :

प्रवास सुखकर होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.