Horoscope 4 December 2025: 'या' राशीच्या लोकांना गुरूकृपा लाभेल

Puja Bonkile

मेष :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

वृषभ :

रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क :

नवीन परिचय होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

सिंह :

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कन्या :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. गुरूकृपा लाभेल.

तुळ :

वाहने जपून चालवावीत. मनोबल कमी राहील.

वृश्‍चिक :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनु :

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

मकर :

संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कुंभ :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

मीन :

काही कामे धाडसाने पार पाडाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.