Horoscope 4 February 2026: 'या' राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील

सकाळ वृत्तसेवा

मेष :

प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृषभ :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन :

काहींना नोकरीत बढतीची शक्यता. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कर्क :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कन्या :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ :

अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

वृश्‍चिक :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

धनु :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आनंदी व आशावादी राहील.

मकर :

हितशत्रुंचा त्रास संभवतो. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मीन :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल,