सकाळ वृत्तसेवा
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.