Puja Bonkile
जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
रखडलेली कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
हितशत्रुंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
संततिसौख्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.