Puja Bonkile
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.