Horoscope 8 February 2026: गजानन महाराजांच्या प्रकट दिनी 'या' राशीच्या लोकांचा प्रवास सुखकर होईल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ :

हितशत्रुंचा त्रास संभवतो. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मिथुन :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.

कर्क :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

सिंह :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या :

व्यवसायाची उलाढाल वाढेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

तुळ :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृश्‍चिक :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

धनु :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. प्रवास सुखकर होतील.

मकर :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ :

गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मीन :

खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.