Horoscope 8 March 2026: 'या' राशीच्या लोकांना हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल

सकाळ वृत्तसेवा

मेष : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

सिंह : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

तुळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

धनु : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मनोबल कमी राहील.