Horscope 12 March : 'या' राशीच्या लोकांचा इतरांवर राहील प्रभाव

Monika Lonkar –Kumbhar

मेष

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रशासकीय कामे मार्गी लागतील.

कर्क

एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल.

सिंह

खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल कमी राहील.

कन्या

दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

तूळ

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

वृश्‍चिक

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

धनु

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.