Horoscope 24 March : 'या' राशीच्या लोकांना नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल

Monika Lonkar –Kumbhar

मेष

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मिथुन

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कर्क

दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

सिंह

वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.

कन्या

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. गुरूकृपा लाभेल.

तूळ

संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृश्‍चिक

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनु

काही कामे धाडसाने पार पाडाल. व्यवसायात वाढ होईल.

मकर

महत्त्वाची कामे दुपारनंतर मागीं लागतील. मनोबल कमी राहील.

कुंभ

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.

मीन

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. प्रवास सुखकर होतील.