Horoscope 6 March : 'या' राशीतील लोकांचे आरोग्य उत्तम राहील, तुमची रास?

Aishwarya Musale

मेष

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

मिथुन

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कर्क

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

सिंह

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

तुळ

गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृश्‍चिक

आर्थिक निर्णय मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

धनु

भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मकर

प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मीन

मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.