Horoscope 8 March : दैनंदिन कामे मार्गी लागणार, वाचा आजचे राशीभविष्य

Aishwarya Musale

मेष

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथुन

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कर्क

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

सिंह

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कन्या

खर्चाचे प्रमाण वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

तुळ

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनु

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर

शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मन आनंदी व आशावादी राहील.