Horoscope Prediction 18 January 2026: 'या' राशीच्या लोकांना गुरुकृपा लाभले

Puja Bonkile

मेष :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन :

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

सिंह :

अनेकांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कन्या :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

तुळ :

जिद्द व चिकाटी वाढेल. गुरुकृपा लाभेल.

वृश्‍चिक :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

धनु :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल.

मकर :

प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कुंभ :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. व्यवसायात वाढ होईल.