काळी पट्टी बांधून निषेध करण्याची परंपरा कशी आणि कधी सुरू झाली? ती विरोधाचे प्रतीक कशी बनली?

Vrushal Karmarkar

काळी पट्टी

निषेध म्हणून काळी पट्टी घालण्याची परंपरा केव्हा आणि कशी सुरू झाली? तिचा इतिहास काय आहे? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

Black Band Protest History

|

ESakal

असंतोषाचे प्रतीक

काळी पट्टी ही शोक, निषेध आणि असंतोषाचे प्रतीक म्हणून फार पूर्वीपासून वापरली जात आहे. १९६५ मध्ये अमेरिकेतील एका विद्यार्थी चळवळीदरम्यान तिला जागतिक ओळख मिळाली.

Black Band Protest History

|

ESakal

अमेरिका व्हिएतनाम युद्ध

त्यावेळी अमेरिका व्हिएतनाम युद्धात गुंतलेली होती. काही विद्यार्थ्यांनी शाळेत काळ्या पट्ट्या घालून शांततापूर्ण निषेध करण्याचे ठरवले.

Black Band Protest History

|

ESakal

डेस मॉइन्स

याचा शोध डिसेंबर १९६५ मध्ये अमेरिकेतील आयोवा राज्यातील डेस मॉइन्स शहरात लागला आहे. १३ वर्षांची मेरी बेथ टिंकर तिचा १५ वर्षांचा भाऊ जॉन टिंकर यांच्यामुळे ही प्रथा सुरू झाली.

Black Band Protest History

|

ESakal

क्रिस्टोफर एकहार्ट

त्यांचा मित्र क्रिस्टोफर एकहार्ट यांनी व्हिएतनाम युद्धात मारल्या गेलेल्यांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठी आणि शांततेचे आवाहन करण्यासाठी शाळेत हातावर काळी पट्टी बांधण्याचा निर्णय घेतला.

Black Band Protest History

|

ESakal

हिंसाचार

त्यांचा हेतू हिंसाचार करण्याचा नव्हता. तर शांततेने आपली मते व्यक्त करण्याचा होता. जेव्हा शाळा प्रशासनाला हे कळले, तेव्हा त्यांनी आधीच जाहीर केले की हातावर काळी पट्टी घातलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले जाईल.

Black Band Protest History

|

ESakal

निर्णय

असे असूनही या विद्यार्थ्यांनी आपला निर्णय बदलला नाही आणि हातावर काळी पट्टी बांधूनच ते शाळेत आले. यानंतर त्यांना शाळेतून घरी पाठवण्यात आले.

Black Band Protest History

|

ESakal

अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन

शाळेतून काढून टाकल्यानंतर अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनच्या मदतीने हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. त्यानंतर जवळपास चार वर्षे कायदेशीर लढाई चालली.

Black Band Protest History

|

ESakal

सर्वोच्च न्यायालय

अखेरीस २४ फेब्रुवारी १९६९ रोजी, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ७-२ अशा बहुमताने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला. हा निर्णय 'टिंकर विरुद्ध डेस मॉइन्स इंडिपेंडंट कम्युनिटी स्कूल डिस्ट्रिक्ट' या नावाने ओळखला जातो.

Black Band Protest History

|

ESakal

शिक्षा

न्यायालयाने हे मान्य केले की विद्यार्थ्यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि केवळ शांततेने काळी पट्टी घातल्याबद्दल त्यांना शिक्षा केली जाऊ शकत नाही.

Black Band Protest History

|

ESakal

अभिव्यक्ती

तेव्हापासून हा निर्णय जगभरातील विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कासंबंधीच्या सर्वात महत्त्वाच्या प्रकरणांपैकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

Black Band Protest History

|

ESakal