नेपाळी गुरखा भारतीय लष्करात कसे? किती असतो त्यांचा पगार?

सकाळ वृत्तसेवा

अनोखी लष्करी परंपरा

भारतीय सैन्यात गुरखा सैनिकांची नेपाळहूनही भरती केली जाते. ही एक अनोखी लष्करी परंपरा आहे.

Nepali Gurkhas | Sakal

नेपाळी अधिकारी वीरचक्र विजेते!

कारगिल युद्धातील 1/11 गुरखा रायफल्सचे कर्नल ललित राय हे नेपाळी वंशाचे अधिकारी वीर चक्र विजेते आहेत.

Nepali Gurkhas | Sakal

भारतात 60% नेपाळी गुरखे

गोरखा रेजिमेंटमधील अंदाजे 60 टक्के सैनिक नेपाळमधून तर उर्वरित भारतातील आहेत.

Nepali Gurkhas | Sakal

तीन देश एकत्र भरती करतात

नेपाळमध्ये ब्रिटन, भारत आणि नेपाळ एकत्र येऊन गोरखांची भरती करतात. यात

लेखी + शारीरिक चाचणीचा समावेश आहे.

Nepali Gurkhas | Sakal

ब्रिटिश आर्मी पहिली पसंती

उत्तम पगारामुळे गोरखा उमेदवार पहिल्यांदा ब्रिटिश आर्मी निवडतात, त्यानंतर भारतीय आर्मी.

Nepali Gurkhas | Sakal

वेतन आणि फायदे कोणते?

गोरखा रेजिमेंटमधील सैनिकांचा पगार त्यांच्या पदावर अवलंबून असतो. सुरुवात 25,000 रुपयांपासून होते. निवृत्तीनंतर त्यांना भारतीय सैनिकांसारखेच वैद्यकीय व पेन्शनचे फायदे मिळतात.

Nepali Gurkhas | Sakal

पहिली नासिरी रेजिमेंट

ब्रिटिशांनी 1815 मध्ये पहिली नासिरी रेजिमेंट स्थापन केली होती, त्यानंतर गोरखा रेजिमेंट वाढत गेली.

Nepali Gurkhas | Sakal

1947 मध्ये तीन देशांचा करार

स्वातंत्र्यानंतर भारत-नेपाळ-ब्रिटन त्रिपक्षीय कराराद्वारे गुरखा रेजिमेंटचे वाटप झाले.

Nepali Gurkhas | Sakal

आजही ‘गोरखा’ हा ब्रँड आहे

भारताच्या सीमांवर आजही 35,000 नेपाळी सैनिक चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात असून त्यांचं शौर्य, निष्ठा आणि योगदान आजही अमूल्य आहे.

Nepali Gurkhas | Sakal

१०० कसोटी, ३० शतके... विराटची कशी आहे कसोटी कारकिर्द?

Virat Kohli | Sakal
येथे क्लिक करा