Aarti Badade
संभाजी महाराज केवळ शूर योद्धेच नव्हे, तर स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे वीर होते.
लहानपणीच शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना स्वराज्याचे महत्त्व आणि त्यासाठी झुंजण्याची प्रेरणा दिली.
रायगडावरील शिक्षण, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शस्त्रविद्या आणि राजकारणाचे ज्ञान मिळवले.
संभाजी महाराजांनी वडिलांकडून आत्मसन्मान आणि शत्रूशी लढण्याची प्रेरणा घेतली.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध दिलेला लढा स्वराज्यासाठी त्यांची निष्ठा दर्शवतो.
अतोनात छळ सोसूनही संभाजी महाराजांनी औरंगजेबासमोर झुकण्यास नकार दिला.
आपला जीव जाईपर्यंत त्यांनी स्वराज्याच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि अमर झाले.
त्यांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने इतिहासात अजरामर झालेल्या संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम!