Sandip Kapde
औरंगजेबाचा दरबारी इतिहासकार साकीब मुस्तेद खान याने "मासीरी आलमगीरी" या ग्रंथात छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा संपूर्ण वृत्तांत नोंदवला आहे.
साकीब खान खुद्द औरंगजेबाच्या छावणीत हजर होता. त्याने संभाजीराजांवरील क्रूर अत्याचार आणि त्यांच्या हत्येची प्रक्रिया स्वतः डोळ्यांनी पाहिली.
फारसी भाषेत कवितांमध्ये विशिष्ट अंक प्रणाली असते. अक्षरांची विशिष्ट रचना केल्यास त्यातून एखादी तारीख किंवा वर्ष अंक स्वरूपात कळते
अशा प्रकारच्या कवितांना "क्रोनोग्राम" किंवा "कालशेष" म्हणतात. त्यातून गुप्तपणे तारखा आणि ऐतिहासिक संदेश व्यक्त केले जातात.
एका फारसी कवितेत लिहिलं होतं – "बा जन व फर्जंद संभा शुद असीर", याचा अर्थ होता, "संभाजी आपल्या कुटुंबासह कैद झाला"
या ओळीत क्रोनोग्रामनुसार हिजरी सन ११०० अर्थात इ.स. १६८९ हे साल स्पष्टपणे दिसते.
औरंगजेबाच्या दरबारातील इनायतुल्ला नावाच्या वकिलाने ही कविता रचली होती. बादशहा त्याने खूश झाला आणि याच दिशेने पुढे विचार करू लागला.
मुघल दरबारात अशा क्रोनोग्राम कविता मोठ्या प्रमाणात रचल्या जात. त्यातून दरबारी कवींना बक्षीसं मिळत असत.
संभाजी महाराजांना कधी आणि कसा ठार करायचं, याबाबत औरंगजेब विचार करत होता. यासाठी योग्य दिवस निवडण्याची प्रक्रिया सुरू होती.
अनेक कवी आणि ज्योतिषी अशा प्रकारच्या गणना करत होते. शेवटी एक ठराविक तारीख बादशहासमोर आली.
ही तारीख एका विशिष्ट कवितेतून ठरवण्यात आली. त्यातील ओळी होत्या – "काफरबचा जहान्नमी रफ्त" अर्थात "काफराचा मुलगा नरकात गेला"
क्रोनोग्रामच्या गणनेनुसार हिजरी सन १६८९ मधील २९ तारीख ही संभाजी महाराजांच्या हत्येसाठी ठरवण्यात आली
बादशहासाठी ही तारीख पवित्र मानली गेली. कारण त्याच्या सिंहासनारोहणाला त्या काही दिवसांपूर्वी ३२ वर्षे पूर्ण झाली होती.
पण हीच तारीख हिंदू पंचांगानुसार फाल्गुन अमावस्या होती. म्हणजेच गुढीपाडव्याच्या आदला दिवस.
हा केवळ एक विलक्षण योगायोग होता. बादशहाला ना हिंदू सण माहिती होते, ना फाल्गुन अमावस्या
त्याने फक्त फारसी कवितेतून ठरलेली तारीख घेतली आणि त्यानुसार आदेश दिला.
हिजरी कॅलेंडर आणि हिंदू पंचांग यांच्यात साधर्म्य नसतानाही, हत्येचा दिवस हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठरला
ही एक ऐतिहासिक सत्यता आहे – जिथे एका क्रूर शासकाने कवींच्या शब्दांवर विश्वास ठेवून एका पराक्रमी सम्राटाची हत्या केली
संभाजी महाराजांच्या हत्येचा दिवस ठरवला गेला तो ना धार्मिक कारणांमुळे, ना खगोलशास्त्राच्या आधारे – तर केवळ एक फारसी कविता आणि संख्याशास्त्राच्या आधारावर!
पण या दिवसाने पुढे हिंदू इतिहासात एक वेगळं स्थान निर्माण केलं. कारण हा दिवस छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण कायम जागवतो!