Vrushal Karmarkar
थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे महान पंतप्रधान! १७२० मध्ये त्यांना पेशवेपद मिळाले आणि त्यांनी अवघ्या भारताला आपल्या तलवारीच्या जोरावर हादरवले.
आपल्या कारकीर्दीत बाजीरावांनी एकही लढाई न हरता मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार केला. त्यांचे नावच विजयाचे प्रतीक बनले.
नर्मदा नदी ओलांडून मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे पहिले सेनापती म्हणजे बाजीराव! त्यांनी स्वराज्याचे स्वप्न भारतभर पसरवले.
२७ फेब्रुवारी १७४० रोजी बाजीरावांनी नासिरजंगविरुद्ध विजय मिळवला. मुंगीपैठण येथे तह झाला आणि हंडिया-खर्गोण मराठ्यांच्या ताब्यात आले.
त्यावेळी पुण्यात कुटुबियांनी बाजीरावांच्या प्रिय मस्तानीला कैदेत ठेवले होते. या घटनेमुळे बाजीरावांचे मन विषण्ण झाले.
मस्तानीच्या वियोगातून मनःस्ताप झालेल्या बाजीरावांनी जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी खर्गोणला प्रयाण केले, पण तेथे त्यांना तीव्र ज्वर झाला.
बाजीराव पेशव्यांनी २८ एप्रिल १७४० रोजी रावेरखेडी येथे जगाचा निरोप घेतला. त्यांचे वय अवघे ३९ वर्षे इतके होते.
बाजीरावांच्या मृत्यूसमयी त्यांची पत्नी काशीबाई व मुलगा जनार्दन उपस्थित होते. मस्तानी मात्र पुण्यातच अडचणीत होती.
बाजीरावांच्या मृत्यूची बातमी मिळताच मस्तानीनेही प्राणत्याग केला. विषप्राशन वा दु:खातून प्राणत्याग – यावर इतिहासात मतभेद आहेत.
रावेरखेडी येथे बाजीरावांची समाधी तर पाबळ गावी मस्तानीची कबर आजही त्या अमर प्रेमकथेची साक्ष देते.