Sandip Kapde
स्वराज्याच्या प्रारंभीच छत्रपती शिवाजी महाराजांना जे काही मोजके सहकारी लाभले त्यात बापूजी मुद्गल नऱ्हेकर देशपांडे यांचा प्रमुख समावेश होता.
इतिहासाच्या आधुनिक लेखनात बापूजी मुद्गल यांच्या योगदानाकडे फारशी दखल घेतलेली नसली, तरी त्यांनी स्वराज्यासाठी मोलाची भूमिका बजावली.
बापूजी मुद्गल हे खेडेबारे मावळचे देशपांडे होते आणि शिवराय पुण्यातील प्रशासकीय व्यवस्थेसाठी आले असता त्यांचा मुक्काम सुरुवातीस खेडेबारे येथेच झाला.
शिवराय व जिजामाता यांच्या वास्तव्याकरिता खेडेबारे येथे वाडा बांधण्यात येत होता आणि तोपर्यंत शिवराय बापूजी मुद्गल यांच्या वाड्यात वास्तव्यास होते.
शिवरायांचे वास्तव्य ज्या भागात झाले तो परिसर पुढे "खेड शिवापूर" म्हणून ओळखला जाऊ लागला, आणि आजही ते नाव टिकून आहे.
कोंढाणा उर्फ सिंहगड किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी बापूजी मुद्गल यांनी बलाचा नव्हे तर युक्तीचा वापर करून आदिलशाही सैन्याला नमवलं.
शिवरायांना माहीत होतं की कोंढाणा बळकावण्यासाठी थेट लढाई केली तर आदिलशहाशी उघड संघर्ष होईल, म्हणून दामनीतीने हा किल्ला ताब्यात घेण्याचं त्यांनी ठरवलं.
शिवरायांनी सिंहगडाच्या हवालदाराशी चर्चा करण्यासाठी आपल्या विश्वासातील बापूजी मुद्गल यांनाच पाठवले आणि त्यांनी ते काम कौशल्याने पूर्ण केलं.
बापूजी मुद्गल कोंढाणा स्वराज्यात आणल्यावर शिवरायांनी त्यांचे कौतुक केले
बापूजींचे पुत्र बाबाजी व चिमणाजी बापूजी यांचेही शिवचरित्रात मोठं योगदान आहे, विशेषतः लाल महालाच्या मोहिमेत.
लाल महालात घडलेल्या शाईस्तेखानाच्या छाप्यात बाबाजी व चिमणाजी यांनी माळ्यावरून मार्ग दाखवून, शत्रूंचा बंदोबस्त केला होता.
या अद्वितीय कामगिरीबद्दल शिवरायांनी बाबाजी व चिमणाजी यांचा सत्कार करत पालखीचा मान दिला, आणि त्यांचे स्वराज्यसेवेतील स्थान अढळ केलं.