'त्या' घटनेला शाहजहानच जबाबदार? मुमताज महलचा मृत्यू नेमका कसा झाला?

Vrushal Karmarkar

शाहजहानचं मुमताज महलशी लग्न

१७ मे १६१२ रोजी शाहजहानने मुमताज महलशी लग्न केले. त्यानंतर १९ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात मुमताज महल अनेक वेळा गर्भवती राहिली. एकामागून एक १४ मुलांना जन्म दिला.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

लग्नानंतर मुमताजला १० मुले

लग्नानंतर मुमताजला १० मुले झाली. तिच्या १० व्या मुलाच्या जन्मात आणि ११ व्या मुलाच्या जन्मात पाच वर्षांचे अंतर होते. १६२७ मध्ये मुमताज १२ व्यांदा गर्भवती राहिली.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

१३ व्या मुलाला जन्म

त्यानंतर दोन वर्षांनी तिने १३ व्या मुलाला जन्म दिला. १६३१ मध्ये १४ व्या मुलाला जन्म दिला. मात्र यावेळी एक अघटीत घटना घडली. यानं मुघल साम्राज्याला धक्का बसला.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

आठ मुले आणि सहा मुली

मुमताज महलच्या मुलांपैकी आठ मुले आणि सहा मुली होत्या. त्यापैकी फक्त सातच वाचले. मुमताज महलने तिच्या चौदाव्या अपत्याच्या रूपात एका मुलीला जन्म दिला.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

दक्षिणेत बंड

शाहजहान कोणत्याही किंमतीत मुमताजपासून दूर राहू इच्छित नव्हता. तेव्हाच मुमताज मुलाला जन्म देणार असताना दक्षिणेत बंड झाले होते.बंड दडपण्यासाठी शाहजहानला बुरहानपूरला जावे लागले.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

मुमताजसोबत बुरहानपूरला पोहोचला

बाळंतपणाची वेळ जवळ आली असूनही शाहजहानने गर्भवती मुमताजला आग्र्यापासून ७८७ किलोमीटर अंतरावर सोबत घेतले. एवढा प्रवास करत तो मुमताजसोबत बुरहानपूरला पोहोचला.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

मुमताजला त्रास

इतक्या लांब प्रवासाचा परिणाम असा झाला की मुमताज खूप थकली. या प्रवासाचा आणि थकव्याचा तिच्या गर्भाशयावरही परिणाम झाला आणि समस्या सुरू झाल्या.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

प्रसूती वेदना

अखेर १६ जून १६३१ च्या रात्री मुमताजला प्रसूती वेदना सुरू झाल्या. एकीकडे मुमताज महाल वेदनेने त्रस्त होती आणि दुसरीकडे दक्षिणेतील बंड संपवल्यानंतर शाहजहान पुढील रणनीती आखत होता.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

सुईणी पाठवण्याचा आदेश

जेव्हा त्याला मुमताजच्या प्रकृतीची माहिती मिळाली तेव्हा त्याने स्वतः तिच्याकडे जाण्याऐवजी सुईणी पाठवण्याचा आदेश दिला. मुमताजने सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत वेदना सहन केल्या.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

एका मुलीला जन्म

त्यानंतर ३० तासांच्या वेदनांनंतर तिने एका मुलीला जन्म दिला. जिचे नाव गौहर आरा आहे. त्यानंतरही, मुमताजची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडू लागली.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

वारंवार संदेश

ती खूप थरथर कापत होती आणि तिच्या पायांना थंडी वाजत होती. तिला खूप रक्तस्त्राव होत होता. दुसरीकडे शाहजहानने मुमताजकडे वारंवार संदेश पाठवले. पण कोणीही परतले नाही.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

बेगम आता ठीक आहे

मध्यरात्रीपेक्षा जास्त वेळ उलटून गेल्यानंतर शाहजहानने स्वतः मुमताजकडे हरममध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याला संदेश मिळाला की बेगम आता ठीक आहे. पण खूप थकली आहे.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

मुमताज गाढ झोपेत

बाळाच्या जन्मानंतर मुमताज गाढ झोपेत आहे. तिला त्रास देऊ नये, हे ऐकल्यावर शाहजहान झोपी गेला. त्यानंतर शाहजहानची मोठी मुलगी जहाँआरा तिथे पोहोचली. आईची प्रकृती बिघडत असल्याचे सांगितले.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

शाहजहानची हरममध्ये धाव

शाहजहानने हरममध्ये धाव घेतली. जिथे मुमताजसमोर अनेक वैद्य होते. मुमताजला खूप वेदना होत होत्या. शाहजहानला पाहून शाही वैद्य वगळता सर्वजण बाहेर पडले.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

मुमताज मरण पावली

शाहजहानचा आवाज ऐकून बेगमने डोळे उघडले आणि ते अश्रूंनी भरले. शाहजहान तिच्या डोक्याजवळ बसला आणि १७ जून १६३१ मध्ये मुमताज त्याच्या मांडीवर मरण पावली.

Mumtaz Mahal Death Story | ESakal

मुमताजच्या मृत्यूनंतर तिच्या १४ मुलांचं काय झालं? औरंगजेबानं किती मुलांना मारलं?

Mumtaz Mahal children | ESakal
वाचा सविस्तर...