Amit Ujagare (अमित उजागरे)
सध्या सर्वत्र छान पाऊस कोसळतोय, त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यानिमित्त गरमागरम फिल्टर कॉफीचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच.
फिल्टर कॉफीसह छान मंद म्युजित किंवा गझल ऐकायला किंवा एखादं छानस पुस्तक वाचायला तर आणखीनच मजा येते.
चला तर मग घरच्या घरी ही फिल्टर कॉफी कशी बनवायची पाहुयात.
2 चमचे फ्रेश कॉफी पावडर घ्या. 1 कप पाणी घ्या. 1 कप दुध घ्या. 1-2 चमचा साखर चवीनुसार.
पारंपारिक घरगुती कॉफी फिल्टर किंवा फ्रेन्च प्रेस घ्या. लांब दांड्याचं भाडं घ्या. एक मोठा कप किंवा ग्लास घ्या.
सुरुवातीला कॉफीचा काढा तयार करावा लागेल. त्यासाठी 'कॉफी फिल्टर'च्या वरच्या भागात दोन चमचे कॉफी पावडर टाका. 1 कप पाणी गरम करुन घ्या नंतर ते कॉफी पावडरवर हळूहळू सोडा. त्यानंतर १०-१५ मिनिटं कॉफीचा काढा खालच्या चेंबरमध्ये थेंबथेंब पडू द्या.
1 कप दूध भांड्यामध्ये उकळेपर्यंत गरम करा, पण लक्षात ठेवा ते उकळू नका. यानंतर मगमध्ये कॉफी फिल्टरमध्ये बनवलेलं 2 ते 3 चमचे कॉफीचा काढा घ्या. त्यानंतर वरुन मग भरेल इतकं दूध घ्या. त्यानंतर चवीनुसार साखर घ्या आणि मिश्रण चांगलं ढवळून घ्या.
यानंतर तुमची फिल्टर कॉफी तयार होईल, हळू हळू घोट घेत खिडकीत बसून बाहेरचा पाऊस पाहत कॉफी पिण्याचा आनंद घ्या.