कॅन्सरचे किती प्रकार असतात? धोका कसा ओळखावा

संतोष कानडे

कॅन्सर

आपल्या शरीरामध्ये अनावश्यक पेशींची वाढ होणे, म्हणजे कॅन्सर असतो. शरीरातीलच घटक असल्यामुळे पांढऱ्या पेशींना हा धोका ओळखू येत नाही.

cancer treatment

प्रकार

कॅन्सरचे साधारण २०० पेक्षा जास्त प्रकार आहेत. काही कॅन्सर हे केवळ पुरुषांमध्ये आढळून येतात तर काही स्त्रीयांमध्ये.

ब्लड सेल्स

कार्सिनोमा हा एक कॅन्सर आहे जो त्वचेत किंवा इतर अवयवांमध्ये असणाऱ्या टिशूजमुळे होतो तसेच सारकोमा हा कॅन्सर हाडे, स्नायू, कार्टिलेज, ब्लड सेल्सशी संबंधित कॅन्सर आहे.

बोन मॅरो

ल्युकेमिया हा बोन मॅरोचा कॅन्सर आहे तर लिम्फोमा आणि मायलोमा हे रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे होणारे कॅन्सर आहेत.

हाडांचा कॅन्सर

कॅन्सरचे प्रकारः- अपेंडिक्स कॅन्सर, ब्लड कॅन्सर, ब्रेन कॅन्सर, हाडांचा कॅन्सर, गर्भाशयाचा किंवा गर्भपिशवीचा कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर, डुओडनल कॅन्सर, कानाचा कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर.

किडनी

यासह अन्ननलिकाचा कॅन्सर, हृदयाचा कॅन्सर, गॉल ब्लेडरचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, स्वरयंत्राचा कॅन्सर, ओठांचा कॅन्सर, लिवर कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, लिम्फोमा, मेसोथेलियोमा, मायलोमा.

थायरॉईड

तसेच तोंडाचा कॅन्सर, वजाईनल कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर, त्वचेचा कॅन्सर, लहान आतड्याचा कॅन्सर, पोट किंवा जठरासंबंधीचा कॅन्सर, टेस्टिक्युलर कॅन्सर, थायरॉईड कॅन्सर या प्रकारांचा समावेश आहे.

पेशी

जेव्हा आपलं शरीर नवीन पेशी बनवत तेव्हा जुन्या खराब पेशी आपोआप नष्ट होतात. पण जेव्हा अनावश्यक पेशी वाढतात, तेव्हा शरीरातला पांढऱ्या आणि लाल पेशींचा बॅलेन्स बिघडतो आणि खराब पेशी शरीरातून नष्ट होत नाहीत. हाच कॅन्सर असतो.

व्यसन

जगामध्ये साधारण ३३ टक्के लोकांचा मृत्यू हा कॅन्सरमुळे होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटना सांगते. व्यसनं, चुकीच्या सवयी, अनियंत्रित आहार यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.