Pranali Kodre
भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकतीच वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा जिंकली. त्यामुळे महिला क्रिकेटला एक नवी ओळख मिळाली आहे.
BCCI Salaries for Men and Women Cricketers
Sakal
दरम्यान २०२२ मध्ये बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंना आणि पुरुष क्रिकेटपटूंना सारखीच मॅच फी देणार असल्याचे स्पष्ट केले होते.
BCCI Salaries for Men and Women Cricketers
म्हणजेच प्रत्येक कसोटी सामन्यासाठी १५ लाख, प्रत्येक वनडे सामन्यासाठी ६ लाख आणि प्रत्येक टी२० सामन्यासाठी ३ लाख रुपये अशी मॅच फी बीसीसीआयकडून दिली जाते.
BCCI Salaries for Men and Women Cricketers
दरम्यान, भारतीय पुरुष संघांचे सामने जवळपास १२ महिने सुरू असतात, तर महिला संघाचे सामने तुलनेने कमी असतात ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.
BCCI Salaries for Men and Women Cricketers
Sakal
तथापि, जरी मॅच फी बीसीसीआयकडून सारखीच मिळत असली, तरी वार्षिक करारातून मिळणाऱ्या मानधनात मात्र मोठी तफावत आहे.
BCCI Salaries for Men and Women Cricketers
Sakal
पुरुष क्रिकेटपटूंसाठी वार्षिक करारासाठी बीसीसीआयने चार श्रेणीमध्ये विभागणी केली आहे, तर महिला क्रिकेटपटूंसाठी तीन श्रेणीमध्ये विभागणी केली आहे.
BCCI Salaries for Men and Women Cricketers
Sakal
बीसीसीआच्या पुरुष क्रिकेटपटूंच्या वार्षिक करारातील A+ श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटी, A श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी, B श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी आणि C श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी रुपये दिले जातात.
BCCI Salaries for Men and Women Cricketers
बीसीसीआच्या महिला क्रिकेटपटूंच्या वार्षिक करारातील A श्रेणीतील खेळाडूंना ५० लाख, B श्रेणीतील खेळाडूंना ३० लाख आणि C श्रेणीतील खेळाडूंना १० लाख रुपये दिले जातात.
BCCI Salaries for Men and Women Cricketers
Deepti Sharma
Sakal