दहशतवाद्यांना किती पगार मिळतो? त्या संघटना निधी कुठून मिळवतात? वाचा सविस्तर...

Vrushal Karmarkar

पहलगाम हल्ला

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यातील शांतता आणि सुरक्षिततेला आव्हान मिळत आहे.

Pahalgam Attack | ESakal

भारताची कठोर पावले

या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलली आहेत. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांना पैसे कुठून मिळतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Pahalgam Attack | ESakal

दहशतवाद्यांचा पगार

त्यांनाही पगार मिळतो का? तर किती मिळतो? असा सवाल उपस्थित होत आहे. तर दहशतवाद्यांनाही 'पगार' मिळतो.

Terrorists Salary | ESakal

दहशतवाद्यांची नियुक्ती

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या दहशतवाद्यांना नियुक्तीच्या वेळी योग्यरित्या स्वाक्षरीची रक्कम, मासिक पगार, कार्यकाळ पूर्ण झाल्यावर बोनस आणि विशेष हल्ल्यांसाठी बक्षीस देखील दिले जाते.

Terrorists Salary | ESakal

दहशतवाद्यांचा पगार किती?

कोलंबिया विद्यापीठाच्या CIAO जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन पत्रानुसार, भरतीच्या वेळी परदेशी दहशतवाद्यांना ५०,००० रुपये आणि स्थानिक दहशतवाद्यांना २५,००० रुपयांपर्यंत मिळतात.

Terrorists Salary | ESakal

मासिक पगार

मासिक पगाराबद्दल बोलायचे झाले तर, परदेशी दहशतवाद्यांना दरमहा १०,००० ते १२,००० रुपये आणि स्थानिक दहशतवाद्यांना ८,००० ते १०,००० रुपये दिले जातात.

Terrorists Salary | ESakal

बोनस

दुसरीकडे त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांना पूर्णत्वाचा बोनस मिळतो. यावेळी त्यांना २ लाख ते २.५ लाख रुपयांपर्यंत पैसे मिळतात.

Terrorists Salary | ESakal

विशेष ऑपरेशन

एवढेच नाही तर 'विशेष ऑपरेशन'च्या वेळी बोनस दिला जातो असे म्हटले आहे. बॉम्बस्फोट किंवा मोठा हल्ला घडवून आणण्यासाठी १ लाख ते २ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते.

Terrorists Salary | ESakal

कंमाडरला जास्त पगार

दहशतवाद्यांच्या कंमाडरला मोठा पैसा दिला जातो, असे संशोधन पत्रात उघड झाले आहे. या कंमाडरला दरमहा सुमारे ५०,००० रुपये पगार मिळतो.

Terrorists Salary | ESakal

कुटुंबांना आर्थिक मदत

याशिवाय दहशतवाद्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देखील मिळते. जेव्हा एखादा दहशतवादी मारला जातो तेव्हा दहशतवाद्याच्या कुटुंबाला लाखो रुपयांची मदत दिली जाते.

Terrorists Salary | ESakal

प्रशिक्षणावर किती खर्च?

एका दहशतवाद्याला प्रशिक्षण देण्यासाठी सुमारे २५,००० रुपये खर्च होतात आणि शस्त्रे, कपडे आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी ३०,००० रुपयांपर्यंत खर्च येतो.

Terrorists Salary | ESakal

निधी कुठून मिळतो?

दहशतवादी संघटनांना वेगवेगळ्या ठिकाणाहून निधी मिळतो. निधीचा मोठा भाग परदेशी एजन्सी, हवाला नेटवर्क आणि परदेशी एनआरआय निधीद्वारे येतो.

Terrorists Salary | ESakal