संतोष कानडे
आघाडीची मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एका मुलाखतीमध्ये तिच्या महिन्याच्या खर्चाबद्दल सांगितलं आहे
प्राजक्ता म्हणते, मी कमी रिसोर्सेसमध्ये राहाते. कपडे लवकर फेकून देत नाही किंवा अनावश्यक खरेदी करत नाही
आधीचं मेकअप मटेरियल असेल तर दुसरं सामान खरेदी करत नाही. शिवाय नवीन भांडीकुंडीसुद्धा घेत नाही, सं प्राजक्ता सांगते
प्राजक्ता पुढे सांगते, माझ्यावर कर्जाचं ओझं आहे. त्यामुळे त्याचे हप्ते मला भरावे लागतात. म्हणून खर्चावर जरा नियंत्रण आहे
तरीही साधारण महिन्याला लाखभर रुपये खर्च होतात, असं प्राजक्ता माळी सांगते. मागे तिने पन्नासेक हजारांचा आकडा सांगितलेला होता
प्राजक्ताने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती एक कवयित्रीदेखील आहे
प्राजक्ता ही मुळची सोलापूर जिल्ह्यातली. तिचा जन्म बार्शीत झाला. ८ ऑगस्ट १९८९ ही प्राजक्ताची जन्मतारीख आहे.
प्राजक्ता सोशल मीडियात सक्रीय असते. तिच्या नवनव्या फोटोंना चाहत्यांनी कायमच प्रेम दिलेलं आहे
प्राजक्तराज नावाने तिने इमिटेशन ज्वेलरीचा ब्रँड सुरु केलेला आहे. अभिनय, निवेदन, व्यवसाय, कविता सगळ्यात आघाड्यांवर प्राजक्ता सरस आहे.